
मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन करतांना उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांची पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर डी आर भोसले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देताना त्यांचे कार्य सामाजिक, शिक्षण व क्रीडा क्षेत्राशी निगडित होते. छत्रपती शाहू महाराजांच्या व महात्मा फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी मागासवर्गीय आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.कर्मवीर डी. आर. भोसले हे शिक्षण , क्रीडा व सामाजिक कार्यासाठी समर्पित असलेले एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते हे सांगितले.

मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर डी. आर. भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन करतांना उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद
याप्रसंगी अशोक मार्कंड,जगन्नाथ पाटील, अण्णासाहेब दुकळे, दत्तात्रय भिलोरे, अजित पगार,बाळासाहेब कवडे, प्रशांत पाटील, गजेंद्र माताडे,भाऊसाहेब सोनवणे, सुनील सुपेकर, नरेंद्र पाटील, वासुदेव कवडे,प्रणोद गोटे,राजेंद्र कदम, निलेश वाळके,गणेश ढोणे ,वाळू बागुल, निवृत्ती भरसट,कपिल पवार, सुवर्णा अहिरे, स्मिता केदारे,मंगीता परदेशी, सुनंदा जाधव,लता आहेर, अश्विनी खोकले,सरला बिडवे, वैशाली पाटील, वैशाली खैरनार,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया गवळी यांनी केले.
