
दीपक इंगळे
शहर प्रतिनिधी डोंबिवली
दिनांक ०९/११/२०२५ रोजी सुमारे ११ वाजे च्या सुमारास मयत आकाश भानू सिंग वय ३८ वर्ष रा. सुरेश पाटील बिल्डिंग, सरोवर बार जवळ, गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व,हा आपला लहान भाऊ बादल भानू शिंग व मित्रानंच्या बरोबर जेवणासाठी हॉटेल मालवण किनारा एम. आय. डी. सी. फेज २, डोंबिवली पूर्व येथें गेले होते. हॉटेलच्या आतमध्ये जातं असतांना आरोपी, अमर राजेश महाजन वय ३६ वर्षे धंदा-दुध विक्री रा. रूम नं. १, महाजन चाळ, कर्वे रोड, विश्वनगर डोंबीवली वेस्ट, कल्याण जि. ठाणे, यास चा धक्का लागल्याने मयत व आरोपी मध्ये शिवी गाळी करून जीवे मारण्याची धमकी देत आरोपी अमर हा बाहेर निघून गेला. सुमारे ००.२० वाजता तो आपले मित्र नामे, आरोपी अक्षयकुमार शंकर वागळे वय २६ वर्षे धंदा व्यवसाय रा. रूम नं. २०७ धनलक्ष्मी एकविरा अपार्टमेन्ट नं. ४, नियर सेन्ट जॉन स्कुल, दावडी एजन्सी रोड, डोंबीवली ईस्ट, जि. ठाणे, आरोपी अतुल बाळु कांबळे वय २४ वर्षे धंदा रिक्षा चालक रा. रूम नं. ९, चाळ नं. २, रेणुका चाळ, सरोवर नगर, कुंभारखन पाडा, सुभाष रोड, डोंबिवली वेस्ट, कल्याण जि. ठाणे, आरोपी निलेश मधुकर ठोसर वय ४२ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. सी. ७०२ शुभ सुष्टी अपार्ट. आंबेडकर चौक, बदलापुर ईस्ट, कल्याण जि.ठाणे, आरोपी प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान वय २६ वर्षे धंदा व्यवसाय रा. १०१ विठ्ठल प्रसाद बिल्डींग, अहिरे रोड, समोर नवनाथ मंदिराजवळ, डोंबिवली पुर्व, कल्याण जि. ठाणे, आरोपी लोकेश नितीन चौधरी वय २४ वर्षे धंदा रिक्षा चालक रा. रूम नं. ४, चाळ नं. २ साई चरण निवास चाळ, सरोवर नगर, डोंबीवली पश्चिम, कल्याण जि. ठाणे यांना बोलावून आणले व मयत आकाश ला हॉटेल मधून बाहेर बोलावून जबर मारहाण करत धारधार चाकुने त्याच्या छातीवर, मानेवर वार करत खून केला. असतांना आकाश सिंग च्या मदतीसाठी आलेल्या सुनील कागले यांच्या गालावर चाकूने वार करून दुखापत करत पळ काढला. काही वेळात स्थानिककांनी मयत आकाश सिंग ला ममता हॉस्पिटल एम. आय. डी. सी. मध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी आकाश याला मयत घोषित केले. घडलेला सर्व प्रकार मयताचा भाऊ बादल भानू शिंग याने दिनांक ०९/११/२०२५ ला सकाळी ०६:१४ वाजता मानपाडा पोलीस स्टेशनं मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गु.रजि.नं. व कलम
१३४५/२०२५ बी.एन.एस कलम १०३(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह कलम ३७ (१) (ए), १३५ महा. पोलिस कायदा प्रमाणे
गुन्हा दाखल करत.लागलीच पोलीस उप आयुक्त श्री अतुल झेडे, परिमंडळ ३ कल्याण, सहा. पोलीस आयुक्त श्री सुहास हेमाडे, डोंबिवली विभाग, वपोनि श्री. संदिपान शिंदे, मानपाडा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेणे कामी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अनोळखी आरोपीचा तांत्रीक विश्लेषण व गुप्त बातमीद्वार मार्फत नाशिक, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी कसुन शोध घेवुन सपोनि संपत फडोळ व पोलीस पथक यांनी गुन्हयातील फरार सहा अनोळखी आरोपीतांना नाशिक शहर पोलीसांचे मदतीने पाठलाग करून शिताफितीने ताब्यात घेवुन ४८ तासाचे आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयपालसिंह राजपुत हे करीत आहे. सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री अतुल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग श्री सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयपालसिंह राजपुत, पोलीस निरीक्षक (प्रशासन) लक्ष्मण साबळे, पोलीस निरीक्षक (का व सु), मनिषा वर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, सपोउनि सुनिल पवार, पोलिस हवालदार संजु मासाळ, शिरीष पाटील, राजकुमार खिलारे, विकास माळी, सचिन साळवी, कृष्णा बोराडे, सुशांत पाटील, घनश्याम ठाकुर, गणेश मोरे, पोना/गणेश भोईर, केशव भोये, पोशि/अशोक आहेर, विजय आव्हाड, सोपान शेळके, गणेश बडे, नाना चव्हाण, बालाजी गरूड, योगेश आडे, महेश झांजुर्णे, मिलिंद यादव यांचे पथकाने केलेली आहे.
