
पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वेंच्या जन्मशताब्दी वर्षात सादर झालेल्या 113व्या काव्यमेळाव्यास् उपस्थित मान्यवर कवी.
नाशिक, (प्रतिनिधी )- कविता ही पुरेशा गांभीर्याने लिहण्याची व वाचनाची गोष्ट असून ती एक साधना म्हणून कवीने स्वीकारायला हवी असे मत मनमाड येथील कवी जनार्दन देवरे यांनी व्यक्त केले.कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय,नाशिक अंतर्गत कविवर्य नारायण सुर्वे कवीकट्टा 113व्या काव्यमेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .या काव्यमेळाव्यात पंचवीसहून अधिक कवीनी आपल्या कविता सादर करून काव्यरसिकांची दाद मिळविली. सर्वप्रथम स्व. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला व ‘अस पत्रात लिवा’या सुर्वे याच्या कवितेने मेळाव्याची सुरुवात राजेश जाधव यांनी केली. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते व सहित्यिक अरुण घोडेराव उपस्थित होते.
श्री.जनार्दन देवरे यांनी बोलताना पुढे सांगितले की,अनुकरणातून प्रत्येक कवीच्या लेखनाची सुरुवात होते हे खरे असले तरी पुढे निरीक्षण व अभ्यासून त्याची स्वतंत्र काव्यशैली तयार व्हायला हवी .यासाठी चिंतन,मंथन व मग प्रकटन आवश्यक असते.
कवीकट्ट्याचे संयोजक कवी रविकांत शार्दूल व सौ.सुशीला संकलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या मेळाव्यात विलास पंचभाई,संजय आहेर,डी. डी.पाटील,सुहास टिपरे,निशांत गुरु,माणिकराव गोडसे,शुभांगी पाटील,मधुकर गिरी,डॉ. प्रशांत आंबरे,कविता कासार,सुशीला पिंपरीकर,डॉ.तेजस्विनी कदम,सोनाली चव्हाण,बाळासाहेब गिरी,गायत्री गवारे,श्रीकृष्ण वैद्य,प्रकाश अहिरे,शुभांगी भोकरे,रंगराज् ढेंगळे,विलास खैरनार इ.कवींनी आपल्या कविता ,गझल,गीते करून दाद मिळविली.
कवी राजेश जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्र निवेदन केले तर संयोजक रविकांत शार्दूल यांनी आभार व्यक्त केले.शहरातील काव्य रसिक या काव्यमेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुर्वे वाचनालयाच्या कर्मचारी वृंदांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
