
ओझर: दि.१३ वार्ताहर
मविप्र संस्थेचे ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर कै डी आर भोसले यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी कर्मवीर भोसले यांचा परिचय सविस्तर करून दिला. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ध्येय समोर ठेवून कर्मवीरांनी नाशिक जिल्ह्यात मविप्र संस्थेच्या अनेक शाळा महाविद्यालये सुरू केली. त्यामुळे तळागाळातील गरीब बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली. कर्मवीरांच्या परिश्रमामुळेच संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. फलक रेखाटन मोनाली निकम वर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब लभडे यांनी केले.
