
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८८ वा दिवस
कित्येक गोष्टी अद्याप आपल्याला करावयाच्या आहेत, परंतु आवश्यक त्या साधनांचा देशात अभाव आहे. आपल्यापाशी बुद्धिमत्ता आहे, पण कर्मशीलता नाही. वेदांत तत्वज्ञान आहे, परंतु ते व्यवहारात उतरविण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही. आपल्या धर्मग्रंथातून वैश्विक समतेचा सिद्धांत प्रतिपादिलेला आहे, परंतु प्रत्यक्ष कार्यात आपण पुष्कळच भेदाभेद पाळतो. भारतात अत्युच्च प्रकारच्या निःस्पृह आणि निःस्वार्थ कार्याचा महिमा उपदेशिला गेला आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपण भारतीय अत्यंत निर्घृण, अत्यंत निर्दयी बनतो. व्यवहारात आपल्या रक्तामासाच्या शरीरापलीकडे आपण विचारच करू शकत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १३ नोव्हेंबर २०२५
★ १७८० शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्मदिन
★ १८५५ आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्मदिन
★ १८७३ कायदेपंडित, संसदपटू पं. मोतीलाल नेहरुंचे सहकारी पुणे विद्यापीठाचे पहिले बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्मदिन.
★ १९१७ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा जन्मदिन.
