
सिन्नर (प्रतिनिधी ) क्रांतीवीर होन्या केंगले व क्रांतिवीर देवाजी राऊत या क्रांतिकारकांना सिन्नर येथे महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर होन्या केंगले व क्रांतीवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की, १८५७ चा राष्ट्रीय ऊठाव सुरू झाला होता.देश इंग्रजांविरूद्ध पेटुन उठला होता
होनाजीने पुढे या लढ्याची सुत्रे हाती घेतली.आणि सावकारांविरूद्धचा लढा अधिक तिव्र केला. होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी अहमदनगर,नाशिक,जुन्नर ,आंबेगांव,घोडेगाव,ओतुर,येथे छापे टाकले व प्रचंड लुट केली.अत्याचार करणाऱ्या सावकारांची तलावारींनी नाके कापुन त्यांची घरेदारे पेटवुन दिली.

त्यांच्या या भितीने सावकांरानी इंग्रज सरकारचा आश्रय घेतला.होनाजी केंगले व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी सरकारी कुमक मागवली गेली.
ब्रिटिश सरकारने होन्या भागोजी केंगले मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी १०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
होनाजी ज्यांच्या घरी जातात त्यांच्या घरातील जनाबाई नावाच्या स्रीला पैशाचे अमिश दाखवून फितुर केले. होनाजी नांदगाव येथे मेंगाळ यांच्या घरी आले.आणि लगेच ही बातमी जनाबाईने हेरगीरीवर असणाऱ्याला सांगीतली .थोड्याच वेळात तेथील मेंगाळाच्या घराला पोलीसांनी वेढा घातला.व १५ आँगष्ट १८७६ साली नांदगाव येथे होनाजीला पकडण्यात आले.दुसऱ्या दिवशी ही बातमी वा-यासारखी सर्वदुर पसरली.लोक हळहळले.गरीब लोकांना अतीव दुःख झाले.आपला कैवारी व तारणहार पकडला गेल्याचे दुःख लोकांच्या जिव्हारी लागले.होनाजीला पकडल्यावर पुण्याला आनले.त्याच्यावर सावकारांना लुटने,गहान खते जाळने,सरकारी मालमत्तेचे नुकसान करने,दरोडा घालने असे आरोप ठेवले.पुढे हा खटला सहा महिने चालला.व होनाजीला सन १८७६ साली फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली.व ठाणे येथील तुरूंगात फाशी देण्यात आले.थोर आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले विनम्र अभिवादन!
विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पेठ परिसरातील आदिवासींचे जंगलांवरील हक्क अधिकार इंग्रजांनी काढून तर घेतलेच मात्र भयंकर अन्याय अत्याच्यार सुरु केला . देवाजी राऊत हे सारं दृश्य पाहत होता . आदिवासींवरील अन्याय देवाजीला सहन नं झाल्याने तो पेटून उठला . इंग्रजी सत्ता उलथून पाडण्याची जणु शपथ घेऊन देवाजीने इंग्रजांना विरोध केला . जंगलामधील महादेव कोळी ,कोकणा, भिल्ल, वारली या जमातींच्या सैन्यांना एकत्र करून गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली या इंग्रजी अधिकारांच्या विरोधात लढा उभारून त्यांना साळो कि पळो करून सोडले . सहा वर्ष या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या देवाजीला इंग्रजांनी १८५७ ला पेठ येथील मामलेदार कचेरी समोर सर्वांच्या समक्ष फासावर चढविले. मात्र फाशीचा दोर तुटला व देवाजी राऊत तेथून जंगलाच्या दिशेने पळाले. इंग्रजांनी त्याला पकडले तेथेच जंगलात फासावर लटकवुन ठार मारण्यात आले. ज्या जोगमोडी व ननाशी दरम्यान त्यांना फाशी दिली ते ठिकाण “राऊत मारा फाटा” म्हणून अद्यापही अजरामर आहे.ज्या झाडावर फाशी दिले त्या झाडाला लागून एक दगड ठेवला आहे ,त्यांचे स्मारक म्हणून. देवाजी राऊत, १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात जोगमोडीजवळ”राऊत मारा फाटा ” येथे शहीद झालेला आदिवासी पुत्र! भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान योद्धा …पेठचा उठाव हा १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्रातील उठाव होता.अशा महान देवाजी राऊत देशासाठी फासावर गेलेल्या क्रांतिकारकाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश गुंजाळ व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रोहित मुठे यांनी मानले.
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, प्रकाश गुंजाळ ,रोहित मुठे,देव ठाकुर,सुनिल जगताप, लखन पाचोरे,कुणाल वरंदळ, समाधान लाड,लकी बैरागी आदि उपस्थित होते.
