
त्रंबकेश्वर (प्रतिनिधी ) ब्रह्मा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज अंजनेरी, त्रंबकेश्वर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक आश्रमशाळा रामनगर,तालुका सिन्नर येथील विद्यार्थी आदित्य गोरख भंडकर याने सादर केलेल्या विज्ञान प्रोजेक्टची राज्यस्तरासाठी निवड झाली त्याबद्दल त्याचा NIF चे शास्त्रज्ञ श्री.प्रशांत श्रीवास्तव,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.प्रशांत दिग्रसकर,श्रीमती सरोज जगताप,उपशिक्षणाधिकारी गणेश फुलसुंदर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.त्याला मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री.योगेश जाधव,श्री.जमीर सैय्यद,प्रयोगशाळा परिचर श्री.गोपाल वरखेडे यांचे हार्दिक अभिनंदन.
