
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८७ वा दिवस
प्रत्येक जण आपला देश घडविण्यासाठी जे प्राणपणाने काम करत आहेत त्यात आपल्या कल्पना महत्त्वाच्या घटक बनतील. आपण सारे मिळून भारतात आणि भारताबाहेरील वंशांसाठी काम करु. त्यासाठी आपल्या सर्वांना झटून काम करावे लागेल, म्हणून मला युवक हवे आहेत बलवान निरोगी आणि तीक्ष्ण बुद्धी असणारै युवक देवाजवळ सहज पोहोचतात. ऊर्जा असते तेव्हाच तुम्ही भविष्य घडवू शकता. तुम्ही थकलेले असताना भविष्य घडू शकणार नाहीत. तारुण्याचा जोश आणि उत्साह आहे तोपर्यंत तुम्ही ठरवू शकतात अशावेळी काम करा. अस्पर्श आणि सुवास न घेतलेली फुले जर देवाच्या पायावर वाहिली तर तो त्यांचा स्वीकार करतो, म्हणून कार्यप्रवृत्त व्हा, जीवन छोटे आहे ते सत्कारणी लावा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५
★ कालभैरव जयंती
★ १९०४ समाजवादी कामगार नेते पत्रकार, श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी यांचा जन्मदिन.
★ १९४६ बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांचा स्मृतिदिन.
★ जागतिक न्यूमोनिया दिन
★ प्रसारण दिन
