
ओझर:दि.११ वार्ताहर
विद्यार्थी तणाव मुक्त असल्याशिवाय यश संपादन करू शकत नाही. विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापनात मन एकाग्र होण्यासाठी ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मन शक्ती केंद्र लोणावळा यांचे तर्फे विद्यार्थी ज्ञानप्रकाश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती तापकीर एस के, नेत्रा पाष्टे अर्चना बोराडे प्रकाश सावंत तनिष्क गाडेवार यांनी अभ्यास यशाच्या युक्त्या या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व ताणतणाव संदर्भात उपाय समजावून सांगितले. यावेळी तणाव विरहित अभ्यास करण्यासाठी मनशांती गरजेची असल्याचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार आत्माराम शिंदे बाबासाहेब गायकवाड रेखा देशमाने रूपाली जाधव मनोरमा सोमवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक बाबासाहेब लभडे यांनी केले.
