
सिन्नर (प्रतिनिधी ) ११ नोव्हेबर २०२५ राष्ट्रीय शिक्षण दिन भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा १३७ व्या जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे साजरा करण्यात आले
यावेळी डाॅ.मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिले शिक्षणमंत्री देशातील शिक्षणव्यवस्थेचा पाया अबुल कलाम यांनी घातला. ते हिंदू-मुस्लीम एकतेचे समर्थक होते. भारतीय मुस्लीम विद्वानांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अविरत कार्याला मानवंदना.. बहुआयामी लेखक, पत्रकार, संपादक, विचारवंत, शिक्षणतज्ञ, संघटक, स्वतंत्रता सेनानी, प्रखर गांधीवादी नेते, स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्यानंतर मौलाना आझाद हे केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले.मौलाना आझाद यांनी शिक्षण मंत्री असताना आयआयटी, साहित्य अकादमी, संगीत अकादमी, बहुउद्देशीय शाळा याबरोबरच समुद्रशास्र यांसारखे आधुनिक शाखांचे शिक्षण देण्यासाठी संस्थांची उभारणी केली.भारत पाकिस्तान फाळणीला कडाडून विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये मौलाना आझादांच नाव प्रथम येते पहिले शिक्षणमंत्री आणि १९९२ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन

या कार्यक्रमाचे सुञसंचलन रोहित मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार अमोल गवारी यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, ट्रायबल आर्मी चे अध्यक्ष अमोल गवारी, रोहित मुठे, सुनिल सावंत लखन पाचोरे,प्रेम शिरसाठ, शाम कुंदे, शाम डांगे,अमोल चव्हाण, कातिॅक मुठे आदि.उपस्थित होते
