
पुणे (प्रतिनिधी )मालेगांव येथील ख्यातनाम राष्ट्रीय कवी लेखक व समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांनी शब्दवेधी बाणाक्षरी साहित्य समूह संस्थापिका अध्यक्ष रागिणी जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी संजय निकम यांचे स्वागत केले. त्याचा सत्कार केला. आणि त्यांना काही विशेष मराठी आणि हिंदी कविता सादर करण्याची सर्वांनी विनंती केली.याप्रसंगी राष्ट्रीय कवी लेखक व समीक्षक संजय निकम यांनी रानी सुंदर पाखरांनी टाकली रे मान आणि सजलेल्या सुरांनी ही काव्य गीत सादर करून रसिक श्रोत्यांना भाव विभोर करून सोडले.तसेच एक झलक, राणा प्रताप,नेताजी या हिंदी कविता सादर केल्या. अतिशय सुंदर विलक्षण असा काव्यानंद पुणेकरांनी अनुभवला. हा कार्यक्रम रागिणी जोशी यांच्या घरी टिपसी हॉटेल कोथरूड पुणे येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. दि.9/11/2025 रविवारी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम सर्व रसिक श्रोते यांच्या उपस्थितीत पार पडला.
