
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८६ वा दिवस
अंतःप्रेरणेनेनुसार कार्य केले पाहिजे. ते जर कार्य योग्य, उत्तम, आवश्यक असेल तर समाज ते डोक्यावर उचलून घेईलच. कदाचित काम करणाऱ्याला हे यश आपल्या जीवंतपणी पाहायला मिळणार देखील नाही. पण आपण स्वतःला तन-मन-धनपूर्वक कार्यात पूर्णपणे झोकून दिले पाहिजे. ज्यांना जगाचे हित करावयाचे आहे त्यांनी आपली सुख-दुःखे, यश, कीर्ती हे सारे 'समुद्रास्मृप्यन्तु' केले पाहिजे. केवळ एका ध्येयासाठी आपण सर्वस्व समर्पणाला सिद्ध झालो नाही, तर दिव्यत्वाचे दर्शन आपल्याला कधीच होणार नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २० कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ११ नोव्हेंबर २०२५
★ १८८४ मानवाधिकारासाठी अजीवन संघर्ष करणारे अमेरिकन नेते मार्टिन ल्युथर किंग यांचा स्मृतीदिन.
★ १८८६ रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्मदिन
★ १८८८ स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी नेते जीवतराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी यांचा जन्मदिन
★ १८८८ भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन.
★ १९२६ विनोदी अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ यांचा जन्मदिन
★ राष्ट्रीय शिक्षण दिन…
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
