
दीपक इंगळे
शहर प्रतिनिधी डोंबिवली
रविवार, दि. ०९ नोव्हेंबर रोजी
डोंबिवलीकर “फ्रेंडशिप रन २०२५” फन रन साठी मॉडर्न कॅफे डोंबिवली पूर्वे पासून ते जिमखान्या पर्यंत १.६ किलोमीटर च्या म्यॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लहान थोरांनी भाग घेत
फन रन मध्ये मनसोक्त धावले आणि एक आगळावेगळा मैत्रीदिन साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजक कल्याण डोंबिवली रनर्स हे होते. परिपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक कसरत करणे धावणे खूप महत्वाचे आहे. तोच उद्देश साध्य करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. या मॅराथॉन मध्ये सहभागी झालेल्या विविध स्पर्धकांसोबत सहभागी झालेले जिजाऊ माँसाहेब यांच्या वेषभूषेतील चिमुकली तनया योगेश पष्टे आणि बाल शिवाजी यांच्या वेषभूषेतील वीरा स्वप्नील पाटील हे बालगोपाळ स्पर्धक विशेष आकर्षण ठरले. तसेच पूर्ण रस्ताभर त्यांना बघून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवाजी चा घोषणा दुमदुमत होत्या..
त्यांना बघून सहभागी इतर स्पर्धक आणि उपस्थित जनमानसांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा , सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. वेगवेगळ्या किलोमीटर साठी वेगवेगळे स्टार्ट पॉईंट आणि वेगळे मार्ग होते. एंड पॉईंट डोंबिवली जिमखाना होता. यावेळी भारतीय जाणतापार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे समाधान तायडे उपस्थित होते.
