
मुंबई (प्रतिनिधी ) अभिजीत दादा राणे( धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष, दैनिक मुंबई मित्र वृत्तपत्राचे संपादक) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ०९/११/२०२५ रोजी धडक कामगार संघटनेचे कार्यालय गोरेगाव आरे कॉलनी मुंबई या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्था व मैत्री संस्था तसेच धडक कामगार युनियन महासंघ यांच्या वतीने वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास उद्घाटक अनिल थत्ते ( बिग बॉस फेम, ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक गगनभेदी ) समारंभाचे अध्यक्ष दिलीप नारद (पोलीस मित्र व समाजसेवक) छत्रपती संभाजी राजे जाधव (राजमाता जिजाबाई यांचे तेरावे वंशज) सिंदखेड विलास खानोलकर (मा.सदस्य संसार बोर्ड भारत सरकार) सुरज भोईर (ज्येष्ठ पत्रकार, कवी, लेखक व समाजसेवक) तसेच कवी लेखक सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमात समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करून त्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
