
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
वाडिवर्हे या ईगतपुरी तालुक्यातील मातब्बर जि.प.गटावर अनेक प्रस्थापित नेत्याचें विशेष लक्ष आहे.मात्र या गटात तुकाराम वारघडे या उभरत्या युवा नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा असुन, जनतेतुनच त्यांनी उमेदवारी करावी अशी मागणी जोर धरत आहे. भविष्यातील आमदारकीचे प्रबळ दावेदार म्हणुन ही वारघडे यांचेकडे पाहिले जात असुन मिनी मंत्रालयात त्यांनी प्रवेश करावा यासाठी जोरदार हालचाली सुरु आहे.
जिल्हयाचे एकेकाळचे समर्थ नेते कै.गोपाळराव गुळवे यांचा वाडिवर्हे हा गट.या गटातुन यापुर्वी त्यांच्या पत्नी कै. श्रीमती इंदुमती गुळवे या निवडुन गेलेल्या होत्या.त्यांनी या काळात जि.प.उपाध्यक्षपद सांभाळले होते.तर त्यानंतर माजी आमदार सौ.निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित यांनाही उपाध्यक्ष पदाचा मान मिळाला.

याच गटातुन कै.गुळवेचें राजकिय वारसदार अँड. संदिप गुळवे यांचा राजकारणाचा श्रीगणेशा झाला.दुर्दैवाने राजकिय गटबाजीमुळे त्यांचे जि.प.उपाध्यक्ष पद येता येता राहिले.अन्यथा या गटास तिसर्यादां जि.प.उपाध्यक्ष पदाचा विक्रमी मान मिळाला असता.
माजी आमदाराचें या गटावर सातत्याने लक्ष राहिले आहे.या पुर्वी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या भावजई सौ.गंगुबाई मेंगाळ तर माजी आमदार सौ.गाविताच्यां कन्या नयना गावित यांनी या गटाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
अनुसुचित जमाती साठी राखीव असलेल्या या गटावर अनेक मातब्बराच्यां नजरा आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे वतीने वाडिवर्हे सह खंबाळे गटावर माजी आमदार सौ.निर्मला गावित व काशिनाथ मेंगाळ या दोघानींही दावा ठोकला आहे. या गटावर मागील वेळेस नयना गावित या सदस्या होत्या, त्यामुळे पुनश्च त्यांची दावेदारी प्रबळ मानली जाते आहे.तर मेंगाळाचेंही हे घरचे मैदान असल्याने ते ही आग्रही आहे.
या दोन मातब्बरामध्ये आता माजी पं.स. सभापती गोपाळा लहांगे यांनीही उडी मारल्याने चुरस कमालीची वाढली आहे.
दुसरीकडे वारघडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कडुन नाव सर्वाधिक आघाडीवर आहे.
