
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८५ वा दिवस
हेतूपूर्ण जगणे, शिस्त, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सत्याचे अधिष्ठान, समत्वभाव, बंधुभाव, निर्भयता, आत्मसंयम, सद्.विचार, सदाचार, लोकहिताच्या कामाबाबत उत्साह ही लक्षणे आपल्या देशात पूर्वीच्या काळात लोकांच्या अंगी भरपूर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यामुळे आपला भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होता. मात्र आज ही लक्षणे आपल्यातून वेगाने नाहीशी होत आहेत. त्याचवेळेस लोकांमध्ये अकार्यक्षमता, कामचुकारपणा, भ्रष्टाचार, बेशिस्तपणा, अनैतिकता, धर्मासंबंधी विकृत कल्पना यातून धर्माचे व देशाचे दिवसेंदिवस अधःपतन होत चालले आहे. हे सारे वेळीच रोखले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १९ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १० नोव्हेंबर २०२५
★ “शिवप्रताप दिन” १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला.
★ १८४८ थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्रकार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्मदिन.
★ १९२० स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्मदिन
★ १९९६ शास्त्रीय संगीत व सुगम संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका माणिक वर्मा यांचा स्मृतीदिन
★ जागतिक विज्ञान दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
