
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
तब्बल सात महिने विक्रमी संततधार पाऊस कोसळल्यानंतर एकदाची पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे लांबलेली भात पिकासह वरई, नागली आदि खरीप पिक कापणीची लगबग सुरु झाली आहे.दरम्यान एकाचवेळी सर्व कामाची घाई सुरु झाल्याने शेतीकामासाठी मजुरानां मागणी वाढली आहे. यामुळे अचानक मजुरीचे दर कडाडले असुन दोनशे ते तीनशे रुपये असणारा मजुरीचा दर दुप्पटीवर म्हंणजे प्रती माणसी सहाशे रुपयावर पोहचला आहे. या वाढत्या मजुरीमुळे शेती नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
यंदा सलग सात महिन्याच्या अतिवृष्टीमुळे भात पिकासह खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.पावसामुळे रोगराईचाही पिकावर प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे.यामुळे चार महिन्याचे श्रम नुकसानीत गेले आहे.
किमान हाती आलेले पिक वाचवण्यासाठी शेतकर्याची लगबग सुरु झाली असुन यंदा सगळयाचींच कामे एकाचवेळी आली आहे. यामुळे अचानक मजुरानां सुगीचे दिवस आले असुन त्यांची मागणी वाढली आहे.यामुळे मजुरीचे दर ही कडाडले असुन एरव्ही दोनशे ते तिनशे रुपये असणारी मजुरी दुप्पटीने वाढली असुन ती सहाशे रुपयावर गेली आहे.दर दुप्पट होऊनही मजुर मिळत नाही आहे.
शेती झाली परवडेनाशी
शेतकरी चहुबाजुनी जणु घेरला गेला आहे. निसर्गाने मारले, व्यापारी लुटतोय. शासन उदासीन आहे.आणि भांडवली खर्च कमी होण्याऐवजी वाढतोच आहे.
एकुण शेती परवडेनाशी झाली असुन, शेतकर्यापेक्षा मजुर आज सुखात आहे.

पांडुरंग खातळे, माजी सरपंच कर्होळे
हमी भाव जाहिर करा
शेतकर्याच्या हाती पिक आहे, ते तो बाजारात विक्रीस आणण्यापुर्वीच हमी भाव जाहिर करावे.शासनाचे नेहमी वराती मागुन घोडे असते.
भात खरेदी केंद्रे किमान मध्यवर्ती गावामध्ये सुरु करावे. तसेच तात्काळ खरेदी व तात्काळ पैसे अशी व्यवस्था करावी.तरच व्यापार्याच्यां मवमानीस आळा बसेल.

जगन्नाथ पोटकुले, माजी सरपंच म्हसुर्ली
