
नांदगाव ( प्रतिनिधी ) आचार संहितेचे उल्लंघन झाल्यास दोषी असणाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल.असा इशारा नांदगाव नगरपालिका मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शामकांत जाधव यांनी दिला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील पालिकेच्या सभागृहात पक्षिय अधिकारी आणि इच्छूक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आचार संहिता काळात उमेदवार आणि पक्षांनी पालन करावयाच्या नियमा संबंधी माहिती त्यांनी दिली. तसेच नामनिर्देशन दाखल करतेवेळी कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी याविषयी सूचना दिल्या.बैठकीला सहाय्यक निवडणूक अधिकारी देवेंद्र कुऱ्हे पालिकेचे अधिकारी आणि इच्छूक उमेदवार उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी दहा मतदान केंद्र असतील ते पुढील प्रमाणे
न्यु इंग्लिश स्कूल,जुने तहसिल कार्यालय,आर.टी.आय.इमारत, सावित्रीबाई फुले विद्यालय,व्ही.जे.हायस्कूल, गांधीनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मतदान केंद्र असणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यालय व व्ही.जे.हायस्कूल येथै दोन मतदान केंद्र असणार आहे. अशी एकूण दहा ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडेल.
