
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८४ वा दिवस
बहुतत्त्वांमध्ये एकत्व हा प्रकृतीचा नियम आहे. त्या व्यावहारिक जगतात असंख्य भेद आहेत, परंतु त्या समस्त भेदांमध्ये अनंत अपरिवर्तनशील निरपेक्ष एकत्व विद्यमान आहे. प्रत्येक व्यक्ती संबंधी असेच म्हणता येईल. कारण व्यक्ती म्हणजे समष्टीचीच छोटीशी आवृत्ती होय. व्यक्ती व्यक्तींमध्ये कितीही भिन्नता असली तरी देखील त्या समस्त भिन्नतेत चिरंतर समन्वय, अखंड एकत्व विराजत आहे. आपल्याला हेच ओळखायचे आहे, आपल्या चित्तावर, मनावर बिंबवून घ्यावयाचे आहे. एकत्व हे जगातील सर्वोच्च तत्व आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १८ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ९ नोव्हेंबर २०२५
★ १८७७ ‘सारे जहाँसे अच्छा’चे या राष्ट्रभक्तीपर गीताचे रचनाकार मोहम्मद इक्बाल यांचा जन्मदिन
★ १९२४ ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पंडित चिंतामण रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्मदिन
★ १९३१ लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्मदिन
★ १९६२ स्त्री शिक्षण व विधवा विवाहास प्रोत्साहन देणारे समाजसुधारक भारतरत्न महर्षी आण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन.
★ १९६७ मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नटवर्य दामोदर गोपाळ ऊर्फ बाबूराव पेंढारकर यांचा स्मृतिदिन.
★ २००५ भारताचे १० वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा स्मृतिदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
