
ओझर: दि.८ वार्ताहर
मविप्र समाज संस्थेच्या ओझर येथील बोरस्ते विद्यालयात दोन दिवशीय विज्ञान कार्यशाळेचा समारोप झाला. यानिमित्त टीडीके कंपनीचे समन्वयक संजीव कुमार पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रशांत निकाळे यांचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक विज्ञान शिक्षक आत्माराम शिंदे यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे परिसरातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विज्ञान साहित्याचा वापर सर्व विज्ञान शिक्षक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षित केल्याबद्दल प्रशिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले. उप मुख्याध्यापक सतीश केदार यांनी आभार मानले.
