
पुणे( प्रतिनिधी) मालेगांव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी लेखक व समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपालजी सबनीस सर यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी या दोन दिग्गज साहित्यिकांनी साहित्य विश्वात घडणाऱ्या घडामोडीवर चर्चा केली.या भेटीत राष्ट्रीय कवी संजय मुकुंदराव निकम मालेगांव यांनी मराठी आणि हिंदी कविता सादर केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी राष्ट्रीय कवी लेखक आणि समीक्षक संजय मुकुंदराव निकम मालेगांव यांचे स्वागत करुन सत्कार केला. त्यांना पुढील साहित्य लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रकवी संजय निकम यांनी आपल्या पुढील नवीन एक हायकु काव्य संग्रह कविता श्रीपाल सबनीस यांना वाचुन त्यावर प्रस्तावना लिहिण्यासाठी दिला.हा कार्यक्रम दि.८/११/२०२५ शनिवार रोजी पेशवाई आर्केड सदाशिव पेठ पुणे येथे सकाळी १० वाजता संपन्न झाला.
