
सिन्नर ( प्रतिनिधी)बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्या आदेशानुसार ऍड असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या विरोधात शनिवार दि,8 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक वावी वेस सिन्नर येथे निर्भय बनो टीम व समविचारी संघटनाच्या वतीने निदर्शन करण्यात आली,
ऍड असीम सरोदे अनेक वर्षांपासून न्यायव्यास्थेतील पारदर्शक्ता, मानवाधिकरचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी काम करत आहे, मधल्या काळात सिन्नर येथे निर्भय बनोच्या वतीने कॉ, डॉ डी एल कराड यांच्या अध्येक्षते खाली ऍड असीम सरोदे, विश्वभर चौधरी व पत्रकार निखिल वागळे याची जाहीर सभा घेतली होती, त्यावेळेस सिन्नरकरांनी ऍड असीम सरोदे यांचे विचार ऐकले आणि कौतुक आणि आत्मसात केले,
ऍड असीम सरोदे यांनी निर्भीड भूमिका घेतल्यामुळे कायदेक्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे, त्यामुळे अनेक जनाना न्याय मिळाला आहे, दाभोलकर नावाच्या मनुवाद्यांने आक्षेप घेत असीम सरोदे यांच्या विरोधात तक्रार केली आणि अड असीम सरोदे यांची सनद महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने तीन महिन्यासाठी रद्द केली, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे, याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो, एका बाजुला सरण्यांयधिशांच्या अंगावर बूट भिरकवणारा मनुवादी वकील, तशेच नेहमी गलिच्छ शब्दात भुकत असलेला सदावर्ते वकील यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही, असीम सरोदे यांनी त्यांच्या खाजगी जीवनात आपले विचार मांडत असतांना फालतू माणसाला फालतू म्हटलं यात काय विशेष आहे,
त्यामुळे महाराष्ट्र व गोवा बार कौनशिलने केलेले असीम सरोदे यांचे निलंबन बेकायदेशीर आहे,
विशेष म्हणजे निर्णय ऑगस्ट ला होतो आणि पत्र अक्टोबर दिले जाते आणि त्यानंतर 3 महिने म्हणजे 30 आक्टोबर पासून लागू होईल असा आदेश काढल्या जातो, हा आदेश असविधानीक आहे, म्हणून सर्व स्थरातुन नाराजी आहे,की हा निर्णय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर आणि न्याय मागणार्या प्रत्येकाच्याच आवाजावर अघात करणारा आहे, म्हणून हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर घाला घालणार्या निर्णयावर पुनर्विचार करावा असे मत उपस्थितीतानी व्यक्त केले,
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, कॉम्रेड हरिभाऊ तांबे, सुभाष कुंभार,राजाराम मुरकुटे, विजय मुठे, प्रकाश मदगे, नदू दोडके,रूपेश मुठे, मिलींद साळवे, लक्ष्मण तळपे, सतोष कारविले, नितीन भालेराव, अशोक अव्हाड, सोहम कारविले यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.
