
सिन्नर (प्रतिनिधी )८ नोव्हेंबर २०२५आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या २२०व्या जयंती निमीत्त महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिवीर राया ठाकर यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व क्रांतिवीर राया ठाकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा दबलेला इतिहास डॉ. गोविंद गारे यांनी पुढे आणण्याचं काम केलं.परकिय इंग्रज सत्ता उलथुन टाकण्याची पहिली सुरूवात कोणी केली असेल तर ती आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुुक्त करणारे,इंग्रजांना सळोकीपळो करून सोडणारे,जमिनदार सावकार यांच्या सावकारी पाशातुन गोरगरीब जनतेला मुक्त करणारे व सावकारांनी कर्जापोटी बळकावलेल्या जमिनी लोकांना परत मिळवुन देण्याचं काम आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी केले.तसेच,साता-याचे छञपती प्रतापराव भोसले यांना इंग्रजांनी पदावरून पायउतार केले होते.ते मिळविण्यासाठी छञपतींना राघोजींनी मदत केली.अशा महान क्रांतिवीरास इंग्रजांनी पकडून ठाणे येथे नेण्यात आले.त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला व एकतर्फी निकाल देऊन दोषी ठरविले गेले आणि २ मे १८४८ ला ठाणे सेंट्रल जेल येथे फाशी देण्यात आले.या महान महानायकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन रामदास कुटे,प्रास्थाविक विजय मुठे तर आभार रूपेश मुठे यांनी मानले.
या कार्यक्रमाला महामित्र दत्ता वायचळे, रूपेशभाऊ मुठे सहसंस्थापक विजय मुठे,अमोल झगडे,बाळासाहेब मुठे,खेतन मुठे,संदिप मुठे,किरण मुठे, अशोक वरंदळ, रामदास कुटे माऊली चांदणे,आकाश धोंगडे प्रकाश गुंजाळ, योगेश मोरे,रोहित मुठे अदि उपस्थित होते.
