
नांदगाव ( प्रतिनिधी ) आज दिनांक ०७/११/२०२५ रोजी कौशल्य विकास उद्योजक्ता व नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव यांच्या वतीने वंदे मातरम या गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याने वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव समूह गीत गायन मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव यांच्या प्रांगणात करण्यात आले. वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन महाराष्ट्रातील 358 तालुक्यामधील 5000 पेक्षा जास्त देश प्रेमींसोबत आज संपन्न झाले. यानिमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशभक्तीपर लघु नाटिकेचे सादरीकरण देखील करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री किसन खताळे हे होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री रवींद्र कातकाडे हे होते.श्री कातकडे यांनी स्वातंत्र्यसमरातील क्रांतिकारकांनी केलेल्या बलीदानाचा उल्लेख करत वंदे मातरम गीतातून क्रांतिकारकांना कशाप्रकारे स्फूर्ती मिळत होती याचा उलगडा केला.सदर कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. माननीय श्री. दिलीप नाईकवाडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदगाव, माननीय श्री. आर. आर. महाजन नायब तहसीलदार नांदगाव, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे मॅडम, व्ही.जे.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री ठाकरे सर, सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ सर, जे. टी. के. इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मनी चावला सर, आदर्श प्राथमिक शाळा नांदगावचे मुख्याध्यापक श्री साळुंखे सर, मविप्र आय.टी.आय.चे प्राचार्य श्री. कैलास जाधव सर, गुरुकुल आय.टी.आय. चे प्राचार्य श्री कृष्णकांत थेटे सर, गुरुकुल पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. विकास झारखंडे सर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक श्री एम.डी. निकुंभ, न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक श्री.चव्हाण सर, पर्यवेक्षक श्री शेवाळे सर, महिला बचत गट प्रमुख,अश्विनी जाधव, क्रीडा क्षेत्रातील रोशन पवार, मेघा जगधने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भिलोरे सर व मार्कंड सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.अरुण मढवई सर यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन व बैठक व्यवस्था श्री. शरद आहेर सर यांनी केली. गीत गायनासाठी हार्मोनियम वर सौ.आहिरे मॅडम यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यू इंग्लिश स्कूल नांदगावचे सर्व कर्मचारी वृंद व शासकीय आय.टी.आय.चे सर्वच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. सर्व औ.प्र.संस्थेचे व इतर शाळांचे ५००० विद्यार्थी ,विद्यार्थिनी व सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास नांदगाव मधील इतर शाळा सर्व शासकीय कार्यालय त्यांचे अधिकारी व कर्मचारी , ग्रामीण पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय , पत्रकार यांचे सहकार्य लाभले.
