
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८३ वा दिवस
नराचा नारायण होणे म्हणजे मानव तत्त्वाची परिपूर्ण अवस्था होय. मनुष्याच्या ठिकाणी जन्मताच वास करून असलेले पूर्णत्व आकारास आणणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या योगे त्याच्या सामाजिक अस्तित्वातून प्रकट होणारे सद्गुण, सदाचार, सद् विचार हर्ष व आनंद प्राप्त करून घेणे, सुनियोजित व कार्यक्षम अशा शिक्षण पद्धतीतून नवसमाजाची निर्मिती होणे. त्यांच्यात धर्म, करुणा, वास्यल्य, आत्मसाक्षात्कार, दैवी आनंदाच्या प्राप्तीची उच्चतम अवस्था गाठणे. आपल्या देशातील दीनदुबळ्या गरीब लोकांविषयी करुणा त्यांच्या उपाशी तोंडात भाकरीचा घास भरवण्याची वृत्ती सर्वसामान्य लोकांना ज्ञान देण्याची तळमळ समस्त मानव जातीवर प्रेम आपल्या देशावर अत्यंतिक प्रेम ही मानवाची परिपूर्ण अवस्था म्हणावी लागेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण ३/४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५
★ संकष्ट चतुर्थी
★ १९१९ सुप्रसिध्द मराठी लेखक, नाटककार, अभिनेते, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीतकार, विनोदवीर बहुआयामी, महाराष्ट्रचं लाडक व्यक्तीमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन.
★ २०१६ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० च्या नोटा अचानकपणे व्यवहारातून रद्द केल्या होत्या.
★ जागतिक शहरीकरण दिन.
★ आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
