
नांदगाव शह नांदगाव ( प्रतिनिधी): स्टॅण्डअप काॅमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केल्याच्या निषेधार्थ नांदगाव पोलीस तालुका बाहेर मनमाड येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करत कुणाल कामगार विरोधात पुन्हा दाखल करण्याची मागणी केली.नांदगावला शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव ,युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. प्रकाश शिंदे, शिवाजी पाटील, रमेश काकळीज, भैय्या पगार, संतोष शर्मा, सुरज पाटील, संजय देवरे, दिनेश ओचाणी, बापू सोनवणे, रवी सोनवणे, गणेश सांगळे, अक्षय पवार, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मनमाड शहर शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक विजय करे यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संजय घुगे, तालुका संघटक नाना शिंदे ,अजित पठाण, कैलास गोसावी, वाल्मीक आंधळे, लाला नागरे ,बाळासाहेब आव्हाड ,सुभाष मालवतकर, संजय दराडे, लोकेश साबळे, महिंद्रा गरुड, निलेश ताठे, दिनेश घुगे, विलास परदेशी, जीवन जगताप ,ऋषिकांत आव्हाड, सागर आव्हाड ,साहिल आव्हाड ,मयूर गोसावी, आणि निलेश व्यवहारे यांचा समावेश होता.
