
डोंबिवली. (प्रतिनिधी दीपक इंगळे) डोंबिवली पूर्व, गुन्हे शाखा क्रमांक 3 कल्याण कडून फिर्यादीच्या तक्रारी वरून,व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे, प्रवासी महिलेची बॅग, सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या रिक्षा चालकाला 24 तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि. 30/10/2025 रोजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालिका बाळकृष्ण गवस, वय वर्ष 56 या दिवाळी च्या सणानिमित्त आपली मुलगि, राहणार टाटा पॉवर,कल्याण पूर्व, आणि स्टार कॉलनी, डोंबिवली पूर्व, या दोन मुलींना फराळाचे सामान घेऊन भेटण्याकरिता आल्या होत्या. सदर प्रवाशी महिला ही, स्टार कॉलनी डोंबिवली पूर्व येथील मुलीस भेटून दि. 31/10/2025 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या, टाटा पावर, कल्याण पूर्व, येथें राहणाऱ्या दुसऱ्या मुलीस भेटण्याकरता स्टार कॉलनी येथून प्रवाशी रिक्षाने जातं असतांना. त्यांनी रिक्षात बसल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याचे मनी मंगळसूत्र त्यांच्या कडील ब्याग मध्ये ठेवले होते. त्यानंतर त्या पिसावली येथील पिंगारा बारच्या समोर पोहचल्यावर रिक्षातुन खाली उतरून रिक्षा चालकाचे भाडे दिले. रिक्षातुन ब्याग घ्यायचे विसरून त्या मुलीची वाट पाहत उभ्या राहिल्या असता, रिक्षा चालक ताबडतोब तिथून निघून गेला. नंतर काही वेळाने प्रवाशी महिलेच्या लक्षात आले की, रिक्षामध्ये ठेवलेल्या दोन ब्याग, घ्याला विसरली होती. त्यापैकी काळ्या रंगाच्या ब्याग मध्ये मनी मंगळसूत्र, दुसऱ्या ब्याग मध्ये कपडे व खाऊ होता. काही वेळात प्रवासी महिलेची दुसरी मुलगी त्यांना घेण्यासाठी आली असता. त्यांनी सदर घटनेची माहिती आपल्या मुलीला सांगितली. त्यानंतर प्रवासी महिला व तिच्या मुलीने रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तो रिक्षा कुठेही आढळून आला नाही. सोन्याचे मंगळसूत्र ठेवलेली व कपड्याची बॅग रिक्षात ठेवली असल्याचे, रिक्षावाल्याला माहित असताना सुद्धा रिक्षा चालक त्या बॅग घेऊन पसार झाला होता. तेव्हा प्रवासी महिला व तिचे जावई योगेश सावंत यांनी घडलेल्या घटनेची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3, कल्याण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली व रिक्षाचा नंबर एम. एच. 05/ सी. पी. 3343, मिळताच रिक्षा व रिक्षा चालकाचा शोध घेतला असता तो पोलिसांना सापडल्यावर, सदर प्रवासी महिलेला गुन्हे शाखा युनिट क्र. 3 कल्याण येथे बोलवण्यात आले तेव्हा, प्रवासी महिलेने रिक्षा चालक नामे जयेश वसंत गौतम वय 32 वर्ष, रिक्षा चालक राहणार पटवा चाळ, रूम नंबर 02, गणेश वाडी, टिटवाळा मांडा रोड, तालुका कल्याण,व तीन तोळ्या वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र दाखवले असता सदर महिलेने रिक्षा चालक तोच असल्याचे ओळखून पोलिसांना सांगितले. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 03 कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून चोरी गेलेले 30 ग्राम, वाजणाचे मनी मंगळसूत्र रुपये 3,60,000/मिळवून देत, आरोपी रिक्षा चालक तसेच त्याच्या ताब्यातील रिक्षा असा 5,21,550/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून रिक्षा चालकास 24 तासात जेरबंद करून त्याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी श्री. आशुतोष डुबरे( पोलीस आयुक्त ठाणे शहर), श्री.पंजाबराव उगले (अप्पर पोलीस आयुक्त) गुन्हे, श्री. अमरसिंह जाधव (पोलीस उपआयुक्त गुन्हे), व श्री. शेखर बागडे ( सह. पोलीस आयुक्त) (शोध-1)गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/श्री. अजित शिंदे, सह पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सपोनि बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे,आदिक जाधव, सुधीर कदम,सचिन भालेराव, पांडुरंग भंगारे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडू, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, दीपक महाजन, प्रवीण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतीश सोनवणे, गणेश हरणे, जालिंदर, साळुंखे मंगल गावित, चालक अमोल बोरकर, यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
