
नांदगाव ( प्रतिनिधी)नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही.जे.हायस्कूल नांदगाव येथे वंदे मातरम गीतास 150 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम गीताचे समूह गायन घेण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मंचावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री.ल.ना.ठाकरे ,उपमुख्याध्यापक माननीय डॉ.श्री .जोगेश्वर नांदुरकर ,टी एम बोर्ड सदस्य माननीय श्री मधे सर ,श्रीमती झोडगेकर मॅडम ,जेष्ठ शिक्षक श्री मोरे सर ,श्री दाभाडे सर ,शिक्षक प्रतिनिधी श्री अहिरे सर ,शाळेची पंतप्रधान कु.भूमिका हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली .शाळेचे उपमुख्याध्यापक डॉक्टर श्री जोगेश्वर नांदुरकर यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला त्यांनी आपल्या मनोगतातून वंदे मातरम या गीताचे महत्त्व विशद करतांना या गीतामुळे हजारो लोकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले व हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा मंत्र ठरले तसेच या गीतातून अनेकांना राष्ट्रासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले तसेच या प्रसंगी बंकिमचंद्र चॅटर्जी व रवींद्रनाथ टागोर यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून सर्व क्रांतिकारकांना त्यांनी आदरांजली वाहिली
यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी हे गीत अतिशय जोशपूर्ण वातावरणात सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सकाळ सत्रात श्रीमती संगीता शिंदे व दुपार सत्रात श्रीमती विद्या महाले यांनी केले फोटो व व्हिडिओ यासाठी श्री .चंद्रकांत दाभाडे यांचे सहकार्य लाभले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व पदाधिकारी सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला
