
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८२ वा दिवस
अहंकार नव्हे, तर आत्मत्याग हेच विश्वातील सर्वोच्च सत्य आहे. आत्यंतिक आत्मत्यागानेच धर्मलाभ होतो. आजच्या जगातले धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रुपाचे बनले आहेत. जगाला आज जर कशाची गरज असेल तर ती चारित्र्याचीच होय. निःस्वार्थ प्रेमाने ज्यांची जीवने प्रज्वलित झाली आहेत अशा लोकांची, सत्याचे अधिष्ठान ज्यांच्या ठायी आहे अशा लोकांची. सत्य, प्रेम, करुणा ज्यांच्या हृदयात असेल त्यांचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली व प्रभावी होईल. बुध्दीचातुर्यने यश मिळेलही मात्र विशाल ह्रदयाने शाश्वत विजय प्राप्त होईल. यावर विश्वास ठेवा. प्रेमाने जग जिंकता येते द्वेषाने नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १६ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २०२५
★ १८५८ स्वातंत्र्यसेनानी लाल – बाळ पाल या त्रयीतील बिपीन चंद्र पाल यांचा जन्मदिन.
★ १८६७ नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा जन्मदिन
★ १८७५ बंकिमचंद्र चटोपाध्याय यांची रचना वंदे मातरम् राष्ट्रीय गाण १५० वर्ष पूर्ण
★ १८८४ इतिहासकार, कृषीतज्ञ, विद्वान, क्रांतीकारक गदर पक्षाचे शिल्पकार डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्मदिन.
★ १८८८ नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्मदिन
★ १९०५ मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा ‘केशवसुत’ यांचा स्मृतिदिन.
