
नांदगांव (प्रतिनिधी) आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सूचनेनुसार नांदगाव व मनमाड नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 साठी इच्छुक उमेदवार पडताळणी व इतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे.

सदर कोअर कमिटीच्या माध्यमातून नगर परिषद निवडणुकीत नांदगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सक्षम उमेदवारांची पडताळणी करण्यात येणार आहे.
शिवसेना कोअर कमिटी आपल्या महायुतीचे सहकारी पक्ष भाजपा, आरपीआय (आठवले) तसेच इतर मित्र पक्षां सोबत चर्चा व विचार विनिमय करून निर्णय घेणार आहे.
नांदगाव कोअर कमिटी सदस्यांमध्ये मा.नगराध्यक्ष राजेश कवडे, मा.नगराध्यक्ष अरुण पाटील, अमोल नावंदर, आनंद कासलीवाल, किरण देवरे, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुनील जाधव, ज्ञानेश्वर कांदे यांचा समावेश आहे.तर
मनमाड कोअर कमिटी मध्ये .
साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, मयुर बोरसे, अल्ताफ खान, राकेश ललवाणी, फरहान खान, योगेश पाटील यांचा समावेश आहे.
