
सिन्नर ( प्रतिनिधी)कर्मवीर भाऊसाहेब हिरे कुळकायदा जनक यांनी सहकाराच्या माध्यमातुन तसेच कसेल त्याची जमिन ह्या क्रांतीकारी धोरणामुळे शेतात राबणारा शेतकरी शेतमजुर जमिन मालक बनले. राज्याचे पहिले महसुल मंत्री म्हणुन त्यांनी केलेली कामगिरी जनतेला आदर्श आहे. त्यांच्या विचारांचा वारसा बहुजनांनी जपावा तसेच त्यांचे प्रेरणादायी सामुहिक शिल्प नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे जेणेकरुन आजच्या पिढीला ते आदर्शवत बनेल असे आज गरुवार दि.06/11/2025 रोजी सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रांगणातील परिसरात आयोजित “कर्मवीर भाऊसाहेब हिरे” यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी महामित्रचे दत्ता वायचळे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे व क्रांतीवीर वसंतराव नाईक या जिल्ह्यातील भुमिपुत्रांनी जिल्ह्यसाठी तसेच राज्यासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याची उभारणी हि पुढील पिढ्यांच्या उध्दाराच्या ठरल्या असे वायचळे म्हणाले.
याप्रसंगी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास दत्ता वायचळे व बाजार समितीचे कर्मचाऱ्यारी यांच्या हस्ते पुष्पमालेने मानवंदना देण्यात आली.
प्रास्तविक व सुत्र संचलनकृ.उ.बा.समितीचे लेखापाल दिलीप राजेभोसले यांनी केले या प्रसंगी बाजार समितीचे कर्मचारी सचिन बाळदे, विजय कोकाटे, संजय डावखर, लहाणु तांबे, मयुर घोरपडे,अजय मिठे, अविनाश पोमनर, हर्षल पगार, सोनाली पाटील आदी हजर होते.
