
ओझर: दि.६ वार्ताहर
मविप्र संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथी ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात साजरी करण्यात आली. भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हिरेंच्या जीवन कार्यावर भाषणे केली. शिक्षिका ज्योती शेवाळे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नव्याने रुजू झालेल्या सेवक शकुंतला आगळे श्रीमती एन.व्ही पवार श्रीमती सविता पवार श्रीमती मोगल श्री पिंगळे आदींचा मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कामकाजास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
