
मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शालेय परिवार..
नांदगाव (प्रतिनिधी)मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे एक थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणमहर्षी व सहकारमहर्षी होते. १९४७ मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणून तर १९५२ ला मुंबई विधीमंडळावर निवडून गेले होते.
मविप्र संस्थेच्या कार्यविस्थारात त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे. नांदगाव येथे संस्थेचे नविन वसतीगृह बांधून त्यांनी १९५० मध्ये ‘प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

१९६० चा कुळ कायदा ऐतिहासिक करार करून ‘कसेल त्याची जमीन’ असा कायदा मंजूर करून घेतला. म्हणून त्यांना कुळ कायद्याचे जनक म्हणतात. सहकार क्षेत्रात त्यांनी १९५० मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान आहे.
शेतकरी,दुर्बळ आणि कष्टकरी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान चिरंतन आहे.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

