
ओढा (प्रतिनिधी) घोडा परिसरातील जाधव वस्तीत वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी मादी बिबट्या जेरबंद झाली ओढा गाव शिवारात काही दिवसापासून बिबट्याचा वावर निदर्शनास आला होता त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवाजी जाधव यांच्या गट नंबर 150 मध्ये वन विभागाने पिंजरा लावला व त्यामध्ये खाद्य म्हणून कोंबड्या ठेवल्या होत्या ही योजना यशस्वी होऊन बुधवारी पहाटे तिसऱ्यात बिबट्या अडकला.
