
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८१ वा दिवस
जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या हातून चुका होतात. बिनकामाचे, कामचुकार लोक दुसर्यांच्या चुका, दोष शोधण्यातच आपले संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतःच्या चुकांनी त्यांनी स्वतःवर ही दुर्दशा ओढून घेतलेली आहे. इतरांना दोषी ठरवल्यामुळे त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडणार नाही. त्यांना कसलाही फायदा होणार नाही. उलट दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे बनतात. म्हणून स्वतःच्या दोषांसाठी दुसऱ्या कोणालाही दोष लावू नका. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घ्या.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १५ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५
★ १७६१ औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्कर देऊन मराठेशाही वाचवणार्या महाराणी ताराबाई यांचा स्मृतीदिन
★ १९२६ पत्रकार, कथाकार, कादंबरीकार प्रभाकर नारायण तथा भाऊ पाध्ये यांचा जन्मदिन
★१९६१ समाजसुधारक, शिक्षण महर्षी, कुळ कायद्याचे जनक, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा स्मृतिदिन.
★ १९८५ रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा स्मृतीदिन.
