
नाशिक ( प्रतिनिधी) जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्या अंतर्गत जिल्हा प्रशासनाने ब वर्ग नगरपरिषदान करिता उपविभागीय अधिकाऱ्यांची तर क वर्ग नगरपरिषद आणि करिता तहसीलदारांची नेमणूक निर्णय अधिकारी म्हणून केली आहे.
दोन डिसेंबरला मतदान व दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला मनमाड सिन्नर ओझर पिंपळगाव बसवंत इगतपुरी त्र्यंबकेश्वर नांदगाव सटाणा भगूर आणि चांदवड अशा अकरा नगरपरिषदांचा समावेश आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाच्या बैठकीनंतर निवडणूक तयारीचा आढावा घेतला नगर परिषदा करिता उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्त अधिकारी पुढील प्रमाणे आहेत
येवला नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे सहाय्यक अधिकारी तुषार आहेर
मनमाड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर सहाय्यक अधिकारी शेषराव चौधरी
सिन्नर नगरपरिषद निवडणूक अधिकारी अभिजीत नाईक सहाय्यक अधिकारी अभिजीत कदम ओझर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे सहाय्यक अधिकारी किरण देशमुख पिंपळगाव बसवंत नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे सहाय्यक अधिकारी श्रीया देवचक्के इगतपुरी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारीअभिजीत बारावकर सहाय्यक अधिकारी धीरज भामरे त्रंबकेश्वर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जाधव सहाय्यक अधिकारी राहुल पाटील नांदगाव नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सौंदाणे सहाय्यक अधिकारी शामकांत जाधव सटाणा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी कैलास चावडे सहाय्यक अधिकारी ज्योती भगत भगूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी पंकज पवार सहाय्यक अधिकारी सचिन कुमार पटेल चांदवड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी सहाय्यक अधिकारी दिनेश सिनारे.
