
नांदगाव (प्रतिनिधी) आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गिरणा धरणाच्या अंजन डावा कालव्या अंतर्गत येणारे कळवाडी देवगड साकुर नरडाणे उंबरदे, चिंचगव्हाण आणि दापोरे या सात गावांसाठी दोन पाणी आवर्तनाचे कायमस्वरूपी पाणी आरक्षणास शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे या सातही गावातील परिसरातील शेतकरी बांधव सामान्य नागरिकांची
गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती या मागणीला आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली असून या गावाच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा संपणार आहे. या गावांना खेटूनच गेला धरण असूनही पाटाला पाणी येत नसल्याने व त्यांचे अनियमित्ता असल्याने गावातील नागरिकांना याचा फायदा होत नव्हता पाण्याचे दोन आवर्तन कायमस्वरूपी आरक्षित झाल्यामुळे या सर्व गावातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे याआधी दुष्काळ परिस्थिती या विविध गावांमधील नागरिक पाण्यामुळे त्रस्त असताना आमदार श्वासांना कांदे यांनी शासनाला पाठपुरावा केल्यानंतर पाण्याचे आवर्तन मंजूर करून घेतले होते आणि या पाठाला पाणी आले होते. याप्रसंगी मोठ्या उत्साहात नागरिकांनी या पाण्याचे जलपूजन आमदार श्वासांना कांदे यांच्या हस्ते करून घेतले होते या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्यांनी भविष्यात आपल्या या सातही गावांसाठी नियमित पाण्याच्या आवर्तनाचे आरक्षण मंजूर करून घेईल असा शब्द नागरिकांना दिला होता आज तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दादाजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदामंत्री महोदय सन्माननीय गिरीजी महाजन साहेब यांच्या सहकार्याने शासन निर्णयातील परी २.२ मान्यतेने ०.७५८९ द.ल.घ.मी. मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्कास मंजुरी देण्यात आली आहे.
आमदार सुहास अण्णा कांदे नेहमीच मतदारसंघातील या गावातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करत असतात यादी एक अतिरिक्त पाण्याच्या आवर्तन सोडणे असो किंवा आता यापुढे दोन आवर्तन कायमचे आरक्षित करणे असो या यशात नागरिकांनी दिलेल्या आशीर्वाद आणि लोकप्रतिनिधी म्हणून ठेवलेल्या विश्वासामुळेच हे कार्य करू शकलो असे मत त्यांनी व्यक्त केले आहे अनेक वर्षांची मागणी आमदार श्वासांना कांदे यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार व्यक्त करत आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया
मतदार संघातील या सर्व गावातील नागरिकांनी सतत माझ्यावर विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला आहे आणि म्हणूनच जनहिताचे कल्याणकारी कार्य माझ्या हातून घडत आहे आणि हे करणे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो यापुढेही शेतकरी बांधवांना व सामान्य जनतेला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर सरकार दरबारी पाठपुरावा करून काम करून आणणे यासाठी मी तप्तर राहील असा विश्वास प्रत्येक नागरिकाला मी देतो
आ.सुहास अण्णा कांदे
