
सिन्नर (प्रतिनिधी )५ नोव्हेंबर २०२५ गुरुनानक यांच्या जयंती महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाची सुरुवात शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले शीख गुरू, गुरु नानक संत यांच्या जन्मदिवस कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुनानक संत यांनी समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा यावर जोर दिला. त्यांनी जात आणि धर्माचा विचार न करता सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुता ठेवण्याचा संदेश दिला शीख बांधवना लोकांमध्ये समानता आणि एकतेची शिकवण दिली गुरुद्वारांमध्ये सर्व जाती धर्मातील लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था (लंगर) आयोजित केली जाते. येथे “नाम जपो, किरत करो, वंड छको” ईश्वराचे स्मरण करा, मेहनत करून कमवा आणि कमावलेल्या भागातून गरजूंना वाटा या शिकवणीवर भर दिला जातो.त्यामुळेच शीख बांधवान मध्ये समानता आणि निःस्वार्थ सेवेच्या तत्त्वांवर आधारित राहतात. ते समाजात राहून, कुटुंबाला महत्त्व देतात आणि प्रामाणिक जीवन जगण्यावर भर देतात. धार्मिक आचरणाचे पालन करण्यासोबतच, ते सामाजिक न्याय, करुणा, आणि मानवी प्रतिष्ठेसारख्या मूल्यांचे पालन करतात. कुटुंब आणि समाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच आध्यात्मिक जीवन जगतात.समानता आणि सामाजिक न्यायाला महत्त्व देतात. नैतिक जीवन: शीख लोक आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणा, करुणा, नम्रता आणि उदारता या मूल्यांचे पालन करतात संत गुरुनानक.यांच्या शीख धर्मग्रंथ च्या शिकवणीनुसार आचरण करतात. अशा महान संत गुरुनानक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश गुंजाळ यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार सुनिल सावंत यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,
आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,सुनिल सावंत साहेब, दिपक कुस्करून,लखन पाचोरे,रमेश सालमुठे संदिप मुठे शाम डागे योगेश मोरे कातिॅक मुठे रोहित मुठे प्रकाश गुंजाळ आदि उपस्थित होते
