
(नवनाथ गायकर यांजकडुन)
महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक या संस्थेतेतील सेवानिवृत्त शिक्षक मधुकर केवळ कदम हे साहित्यिक म्हणून परिचित होतेच पण मनानं हळवे निसर्गावर काव्य करणारे उत्तम कवी होते .
आपल्या मधुर स्वभावानं सर्वांना आपलेसे करणारे असे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने अतिशय दुःख होत आहे
त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना जीवनाचा मार्ग दाखवला नुसता मार्ग दाखवला नाही तर जगण्याची वाट दाखवली आणि आपल्या अनेक विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवलेला असा हाडाचा शिक्षक म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते
.भेटेल त्याला आपल्या पहिल्या भेटीतच आपलेसे करण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ होते .त्यांनी अनेक नवकवींना चालना दिली तसेच अध्यात्माचा अभ्यास असणारे असे ते साहित्याचे वारकरी होते
प्रत्येकाचे तोंड भरून कौतुक करत कधीच कोणाबद्दल वाईट शब्द बोलत नसे प्रत्येकाचे चांगले गुण त्यांनी इतरांना सांगितले असे दुसऱ्यांना मोठेपणा देता -देता तेही केव्हा मोठे झाले ते त्यांना सुद्धा कळत नव्हते .
कवी नवनाथ गायकर, बाबासाहेब थोरात, कै.स्वामी गायकर, राजु आतकरी सारखे किती तरी नवीन कवी व साहित्यिक त्यांनी घडवले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा यांचे वतीने नवनाथ गायकर यांनी त्यांचा जीवनगौरव देऊन सन्मान केला.
आपला शिक्षकी पेशा सांभाळून समाजाचे पण काही देणं लागतो या भावनेने त्यांनी समाजाशी नाळ जोडली त्यांना लहान मुले आणि फुले फार आवडत असे. त्यांनी अनेक साहित्य संमेलनात आपण स्वरचित कविता गात आसत , त्यांच्या प्रत्येक कवितेला दाद मिळत होती .आता सेवानिवृत्त झाल्यानंतर झाडाझुडपात ,राणावणात ,डोंगरदऱ्यात फिरायंच ,धार्मिक स्थळांना भेटी द्यायच ,तीर्थयात्रा करण्यासाठी जायचे वय असताना त्या विश्वात्मक परमेश्वराला ते बघवलं नाही आणि आजाराचा ससे- मिरा त्यांच्या पाठीमागे लागला .
आणि त्यातुनं बाहेर पडण्याऐवजी आजार वाढतच गेला आणि अखेर त्या मधुर स्वभावाच्या मधुकरा घेऊनच गेला अशा या महान साहित्याच्या वारकऱ्याला , सरस्वतीच्या साधकाला श्री महागणपतीच्या भक्ताला कोटी कोटी प्रणाम
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नासिक जिल्हा यांचे वतीने या कवीस भावपुर्ण श्रद्धांजली.
लेखन
बाबासाहेब थोरात, मुख्याध्यापक, मुकणे महाविदयालय
