
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०८० वा दिवस
प्राचीन काळाप्रमाणे या देशात धर्म हा राजप्रासादापासून ते अत्यंत गरीब, श्रमिकांच्या झोपड्यांपर्यंत मुक्तपणे प्रविष्ट झाला पाहिजे. भारतात धर्म ही, कल्पना सहजतेने व सुलभतेने उपलब्ध असली पाहिजे. भारतात आपल्याला हेच कार्य करावयाचे आहे; पण संकुचित स्वरूपाचे संप्रदाय स्थापून व क्षुल्लक मतभेदांच्या मुद्यांवरुन भांडून ते कार्य साध्य होणार नाही ज्या मुद्द्यांवर आपले सर्वांचे एकमत आहे त्याच मुद्द्यांचा आपण प्रचार करू या आणि मग मतभेदांवरून होणारे कलह आपोआप थांबतील. मी भारतीयांना वारंवार हेच सांगतो. एखाद्या खोलीत शेकडो वर्षापासून अंधार असेल तर केवळ अंधार अंधार असे ओरडण्यापेक्षा तेथे प्रकाश आणा की अंधार तत्क्षणी तो अंधार नाहीसा होईल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १४ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५
★ त्रिपुरारी पौर्णिमा
★ तुलसी विवाह समाप्ती
★ गुरुनानक जयंती
★ १८७० बंगाल मधिल विख्यात कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, पत्रकार, काँग्रेस नेते, देशबंधू चित्तरंजन दास यांचा जन्मदिन.
★ १९१५ कायदेपंडित, समाजसुधारक, उत्तम प्रशासक, काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा स्मृतिदिन.
★ मराठी रंगभूमी दिन.
