
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
सोईच्या ठिकाणी ये जा करणे साठी एकामागोमाग एक भारंभार बसेसची सोय करणारे ईगतपुरी आगार तालुक्यातील गैरसोईच्या अतिदुर्गम व आदिवासी भागातील बस फेर्या मनमानी पद्धतीने कधीही सुरु व बंद करत आहे.या आगाराच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध करुन संताप व्यक्त होतो आहे.
आहुर्ली हे मध्यवर्ती गाव असुन नासिक, त्रंबकेश्वर व घोटी- ईगतपुरी जाणे येणेचे हे तिहेरी वळण रस्ता आहे.पण या मार्गावरुन चक्क नाशिक शहर व जिल्हयास जाणारी पहाटेची बस वगळता एकही बस फेरी नसावी हे आश्चर्य आहे.येथुन अनेक विदयार्थी, कामगार वर्ग व शासकीय कामासाठी नाशिक जाणारे अनेक प्रवासी असतानांही त्यांना दिवसभरात एक ही बस उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनाचां सहारा घ्यावा लागतो आहे, किंवा दुप्पट पैसे खर्च करुन फेरा मारुन त्रंबकेश्वर वा घोटी वरुन नासिक जावे लागते.आगारात बसणारे व्यवस्थापक आधिकारी यांना हे कळत नाही का ? हे आधिकारी फक्त खुर्ची उबवण्यापुरतेच आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
दुपारी ईगतपुरीहुन एक ते दिड वाजता सुटणारी मानवधन विकास कार्यक्रमातंर्गतची शालेय फेरीची बस ही आहुर्ली मार्गे असतानांच ती शालेय फेरी ऐवजी प्रवाशी वाहतुक भलत्याच मार्गाने करते असल्याचे समजते आहे.ही शासनाची शुद्ध फसवणुक असुन अशा आधिकार्यावर कठोर कारवाई करणेची गरज आहे.
कुशेगाव,मोडाळे व शिरसाटे हे तालुक्यातील डोंगर दरीत वसलेले अतिदुर्गम व आदिवासी बहुल गावे आहेत.या गावानां जाणारी दुपारची फेरी सातत्याने अनियमीत असल्याने आदिवासी प्रवाशाची मोठी गैरसोय होते.
आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी बांधवानां नजरेसमोर ठेऊन सर्व योजना व सुविधा देणे गरजेचे असतानां शहरी भागात अनावश्यक अशा लागोपाठ बसेस सोडतानां आदिवासी भागातील बस फेर्या मात्र पुर्वसुचना न देता मनमानी पद्धतीने मनाला वाट्टेल तेव्हा सुरु, व वाट्टेल तेव्हा बंद केल्या जातात.
यामुळे आदिवासी प्रवाशानां मनस्ताप सहन करावा लागतो.
