
मराठी संवर्धन ,प्रचार प्रसार या हेतूने स्थापन झालेल्या साहित्यसंपदा संस्थेचा सातवा वर्धापनदिन गणेश मंदिर डोंबिवली येथे येत्या रविवारी पार पडणार असून साहित्य अकादमी बालसाहित्यिक पुरस्कार प्राप्त एकनाथ आव्हाड अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध गझलकार आणि गीत रामायण हिंदी मध्ये भाषांतरित करणारे दत्तप्रसाद जोग, पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, ,अनेक सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबविणारे आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते, असे साहित्य,समाज,शिक्षण,कला क्षेत्रातील विविध मान्यवर निमंत्रित म्हणून उपस्थित रहाणार असल्याचे साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी सांगितले.
साहित्यसंपदा प्रकाशन संस्थेद्वारे काही निवडक पुस्तकांचा सन्मान होणार असून *‘साहित्यसंपदा पुस्तक रत्न’* पुरस्कारांची यादी स्वागताध्यक्षा सलोनी बोरकर यांनी जाहीर केली. सौ.सोनाली सुहास जगताप लिखित 'ॐ नमः शिवाय'(काव्य संग्रह), ऋचा पारेख लिखित आत्मयन'(लेख संग्रह), शिल्पा प्रफुल्ल च-हाटे लिखित 'भेट तुझी माझी' (कथासंग्रह ),गीतांजली योगेश वाणी-काव्यांगी (अष्टाक्षरी काव्यसंग्रह), 'अमृताच्या जणू ओंजळी' - शब्दांकन - सुकन्या जोशी,पुस्तक चरित्र विभाग, 'डोळ्यांवर बोलू काही - डॉ विंदा भुस्कुटे (संकीर्ण) ,'आत्मविश्वास यशाचा पाया' - संकेत खर्डीकर लेख संग्रह आणि शिवाजी महारांचा सन्मान करणारा चारुदत्त चिखले लिखित शिवचरित्र कथा-काव्य 'शिवायन' या पुस्तकांना परीक्षणाद्वारे पुरस्कार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले.
