
सिन्नर ( प्रतिनिधी) सिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते, मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतचे संस्थापक तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे संस्थापक सिन्नरभुषण माजी आमदार सुर्यभानजी गडाख यांच्या ६ व्या स्मृतीदिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामित्र परीवारातर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शिवरायांना मानवंदना देऊन सभेची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी अध्यक्ष महामित्र वायचळे यांनी नानासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देतांना म्हटले कि गडाख नाना हे तालुक्याचे लोकनेते होते. माध्यमिक लोकशिक्षण मंडळ हि शिक्षण संस्था, मुसळगांव सहकारी औद्योगिक वसाहत , महात्मा फुले विद्यालयाची जागा तसेच गावोगावचे पाझर तलाव, ग्रामीण भागातील रस्ते,यांच्या रुपाने नानासाहेबांच्या स्मृतीं सदैव चिरंतन आहेत. तालुक्यातील शैतकरी, भुमीहिनांसाठी नानांनी खंबीरपणे लढे उभारले आणि प्रसंगी तुरुंगवासही भोगला.तालुक्यातील गोरगरीबांचा आवाज म्हणजे नानासाहेब होत. क्रांतीसिंह नानापाटलांची सिन्नर शहरात पाचशे बैलगाड्यांनी काढलेली मिरवणूकीला देखील यानिमित्ताने उजाळा मिळाला.

याप्रसंगी सागर भालेराव यांनी नानासाहेबांचे तत्कालीन शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या बरोबर शाहिरी जलसाच्या माध्यमातून उभी केलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत लोकलढे उभारताना सिन्नर पंचायत समितीचे सभापती, लोकल बोर्डाचे सदस्य आणि दोन वेळा तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केल्याच्या स्मृती जागवल्या.
अभिवादन सभेस युनुस मंजुरी, विलास जगताप अनिल ठाणेकर,प्रकाश माळी, राजेंद्र सातपुते,अजय कुलकर्णी, धनंजय परदेशी, रामनाथ तुपे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय मुठे तर सुत्रसंचलन मनोज माळी यांनी तर आभार सुनील कालेवार यांनी मानले
