
(कै.खंडु गुळवे वर आधारीत लेख)
नवनाथ गायकर,ईगतपुरी
अध्यात्म, धार्मिकता याचा आव आणुन धंदा करणारी माणसं परमार्थिक क्षेत्रात ढिगाने सापडतील.पण अध्यात्मता, विचार सर्वस्वी अंतकऱणात झिरपुन तशी वागणारी माणसं विरळीच.
कै.खंडु भाऊ गुळवे तथा माऊली हे वरील बावनकशी अध्यात्म व्याख्येत चपखल बसतात.
हल्ली परमार्थाचा बाजार मांडला गेला आहे.पण परमार्थात विशुद्ध अंतःकरणाने वावरणारे खंडु माऊली विरळेच.
बेलगाव कुर्हे ता.ईगतपुरी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माऊलीच्यां घरात जणु,
माझ्या वडिलाचीं मिरासी गा देवा
तुझी चरणसेवा पांडुरंगा
असा वारकरी संप्रदायाचा वारसाच होता.
चेहर्यावर सदैव स्मितहास्य, भाव गंभीर मुद्रा आणि अगदी कमी बोलणे व ते ही अगदी मृदु आवाजात.
नव्वद वर्षाचे आयुष्य निरोगी पद्धतीने जगलेले खंडु माऊली निर्व्यसनी राहिले आणि हेच संस्कार भावी पिढीलाही त्यांनी दिले.

कामामध्ये काम, काही म्हणा राम राम
या उक्ती प्रमाणे आयुष्यभर त्यांनी भगवद् भक्तीचा आनंद सोहळा तर लुटलाच ,पण
संसार करावा नेटका, दिसु देऊ नये फाटका
या उक्ती प्रमाणे संसारही हेवा वाटेल असाच केला.
उत्तम शेती सांभाळुन त्यांनी दोन्ही मुलां मुलीवर उत्तम असे संस्कार केले.
जेष्ठ मुलगा निवृत्ती तथा भाऊ हे नाशिक साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.तर लहान मुलगा ज्ञानेश्वर तथा अण्णा नाशिक जिल्हा न्यायालयात प्रतिथतयश वकिल म्हणुन कार्यरत आहे.
नातु विजय हा न्यायधीश असुन तो वसई येथे कर्तव्य बजावत आहे.दुसरा नातु शाम हा मुंबई येथे शासकीय आधिकारी तर नात जावई लष्करात कर्तव्य बजावत आहे.
ईगतपुरी तालुक्यात कुठेही नाम सप्ताह सोहळा असला की दिवसभर शेतात राबुन नंतर रात्री परमार्थिक आनंद लुटायचा.या सातक्यपुर्ण परमार्थिक भक्तीने ते अगदी सात्विक झाले होते.
तोंडातुन आयुष्यात कधीही साधी शिवी त्यांनी दिली नाही. आणि कुणी दिली तरी त्यांस कधी प्रत्युत्तर ही दिले नाही.
वयाची नव्वदी पर्यंत अगदी अखेरच्या क्षणापर्यंत ते परिसरात सायकल वरुन फिरत होते व शेवट पर्यंत काम करत होते.
अत्यंत आनंदी व सात्विक जीवन जगत नव्या पिढीलाही सुसंस्कारीत करत उत्कर्ष साधण्याचा एक आदर्शच खंडु माऊलीनीं जगाला घालुन दिला आहे.
कै.खंडु माऊलीनां विनम्र अभिवादन..
लेखन – नवनाथ गायकर
