
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७९ वा दिवस
प्रत्येक गोष्टीतील आवश्यक भाग कोणता व अनावश्यक भाग कोणता याचा विवेक करायला शिकले पाहिजे. गाभा हा शाश्वत असतो. अन्य गोष्टी या काही मर्यादित काळापुरत्या महत्त्वाच्या असतात. वेदांमध्ये सांगितलेली सत्य तत्वे शाश्वत, चिरकाल आहेत. ती त्रिकालाबाधित आहेत पण स्मृती मात्र कालसापेक्ष आहेत. जसजसा कालौघ पुढे जाईल तसतशा नवनव्या स्मृती येत राहतील. या देशाच्या भूतकाळात अनेक श्रेष्ठत्तम गोष्टी घडल्या आहेत. भविष्यकाळात याहुनी श्रेष्ठतम गोष्टी घडावयास मोठा वाव आहे. आपण सर्वांनी मिळून पुढे गेले पाहिजे. प्रगती केली पाहिजे, पराक्रम केला पाहिजे. श्रेष्ठतम कृती हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ४ नोव्हेंबर २०२५
★ वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन हरीहर भेट
★ १८४५ ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करणारे भारतीय सशस्त्र क्रांतींचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन.
★ १८८४ प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्मदिन
★ १८८४ ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्मदिन
★ १८९४ महात्मा गांधीजींचे अनुयायी, कोकणचे गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्मदिन.
★ २००८ बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले.
