
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
ईगतपुरी तालुक्यातील खंबाळे गटातील कावनई गणावर इच्छुकाच्यां उडया पडत आहे. अगदी गाव तेथे उमेदवार अशी स्थिती झाल्याने या भाऊ गर्दीमुळे नेत्याचीं मात्र डोकेदुखी वाढणार आहे.
कावनई गणातुन सांजेगाव व कावनई ही दोन मोठी मतदार संख्या असलेली व निर्णायक कौल देणारी गावे आहेत.या दोन्ही गावातुन किमान चार दोन उमेदवार इच्छुक आहेत.
यात भाजप कडुन सांजेगाव येथील युवा चेहरा म्हणुन अँड. अभिषेक गोवर्धने यांचे नावाची मोठी चर्चा आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात वकिली करणारा हा युवा चेहरा असुन भाजपच्या युवा मोर्चाचे ते काम करत आहेत.
कर्होळे येथील माजी सरपंच पांडुरंग खातळे यांचे नाव रा.कॉ.कडुन आघाडीवर आहे. याशिवाय ओंडली येथील युवा नेते विजय निवृत्ती पा. खातळे यांचेही नावाची जोरदार चर्चा आहे.
या इच्छुकाचीं यादी मारोतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच चालली असुन अनेक जणानीं गणासाठी आपली उमेदवारी जाहिर करुन सोशल मिडीयावर जाहिरात करायलाही सुरुवात केली आहे.
