
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन-
वारा वाहिल तसे तोंड फिरवणारे चाणाक्ष राजकीय नेते सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.यातुन ते जनतेचं नेमकं किती भलं करतात कुणास ठाऊक ? पण स्वत ;च हित मात्र न विसरता साधतात.
खंबाळे गट हा जि.प. साठी अनु.जमाती राखीव झाला असुन या गटावर राजकिय पुनर्वसन व्हावे या हेतुने माजी आमदारानीं उडया ठाकल्या आहेत.
नुकत्याच पक्षीय बैठकीत या गटावर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही माजी आमदारानीं आपल्या परिवारास पुढे करत निवडणुक लढवायची इच्छा जाहिर केली आहे.या वरुन आता या दोन्ही माजी आमदारांमध्येच पक्षातच चांगलीच चढाओढ जुंपली आहे.
खंबाळे या पुर्वीच्या शिरसाटे जि.प.गटातुन मागील वेळेस माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या सुविदय पत्नी सुशिला मेंगाळ या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या गटावर आपला दावा मेंगाळानी ठोकला असुन पत्नीची उमेदवारी पुन्हा कायम करुन जि.प.सदस्यत्वाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात मेंगाळ हे आहेत.
एकदा मिळाल्यानंतर सलग चार निवडणुकामध्ये आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली आहे.मात्र जि.प.सदस्य पद गेल्या पंधरा वर्षापासुन त्यांचे परिवारात आहे.
सौ.गंगुबाई मेंगाळ (वाडिवर्हे), सौ.सुशिला मेंगाळ (एकलहरे) व सौ.सुशिला मेंगाळ (शिरसाटे) यांचे रुपाने मेंगाळ परिवार जि.प मध्ये सातत्याने कार्यरत आहे.
तर माजी आमदार सौ. निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित या मागील वेळेस वाडिवर्हे जि.प.गटाच्या सदस्या होत्या. शिवाय अडिच वर्ष जि.प. उपाध्यक्षा ही होत्या.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व सो निर्मला गावित या सातत्याने पराभुत झालेले आहेत.मात्र राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी धडपड चालवली असुन परिवाराचे रुपाने जि.प. मध्ये का होईना सत्ता मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.
या दोन्ही नेत्यांनी आता खंबाळे गटावर दावा ठोकला आहे.
