
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांचेकडुन
राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री ना.अजित (दादा) पवार यांची राज्याच्या ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीचे रा.कॉ. चे प्रदेश चिटणीस गोरख बोडके यांनी स्वागत केले आहे.
महाराष्ट्रातील गाव खेडयात, अस्सल रांगडया मातीत क्रिडा व कला चे महान कौशल्य लपलेले आहे. राज्य पातळीवर यांस प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भारत ही भविष्यात क्रिडा क्षेत्रात महासत्ता बनु शकतो.
राज्याचे उप मुख्यमंत्री ना. अजित पवार या दिशेने निश्चितच भरीव काम करतील हा विश्वास गोरख बोडके यांनी व्यक्त केला व ना.पवारानां शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
