
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०७७ वा दिवस
आत्मविश्वास मानवजातीचे सर्वात अधिक कल्याण करू शकेल. ह्या आत्मविश्वासाच्या आदर्शाचा जर अधिक प्रमाणात प्रचार झाला असता आणि तो जर अधिक प्रमाणात आचरणात आणला गेला असता तर आपल्यातील बरेचसे अशुभ आणि आपले बरेचसे दुःख नाहीसे झाले असते अशी माझी खात्री आहे. समग्र मानवजातीचा इतिहास वाचून बघा, तुमच्या निदर्शनास येईल की, समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे ह्या आत्मविश्वासाची. आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मतःच त्यांच्यात होती, आणि तदनुसार ते मोठे झालेही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ११ कार्तिक (उर्जमास) शके १९४७
★ कार्तिक शुक्ल /शुध्द ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २ नोव्हेंबर २०२५
★ प्रबोधिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ पंढरपूर यात्रा
★ तुलसी विवाह प्रारंभ
★ नामदेव महाराज जयंती
★ १९३६ ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
★ १९५० नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जार्ज बर्नार्ड शॉ यांचा स्मृतीदिन
★ १९९० महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे एक प्रमुख शिल्पकार, प्लास्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक पद्मविभूषण भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा स्मृतीदिन.
★ औद्योगिक सुरक्षा दिन.
