
नांदगाव (प्रतिनिधी )राज्यस्तरीय एकल महिला हक्क परिषद”मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे आणि एकता ग्रामविकास संस्था, पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकल महिला हक्क परिषदेचे पुणे येथे बार्टी येरवडा संकुल, जेल कॉर्नर, पुणे येथे पार पडली, नाशिक जिल्हय़ातून सामाजिक कार्यकर्त्यां विद्याताई कसबे या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

एकल महिलांपुढील आव्हाने राज्यातील एकल महिला योजनांची सद्यस्थिती आर्थिक स्वावलंबन आणि उपजीविकाविविध योजनांची सद्यस्थिती अंमलबजावणीमध्ये जाणवणारे अडथळे कायदेशीर हक्क आणि मालमत्ता सुरक्षा विविध कायद्यांची उपयुक्तता वारसा, निवासाचा हक्ककायदेशीर मदत सामाजिक सुरक्षा आणि पुनर्वसनमनोविकास यंत्रणा आरोग्य, निवारा, मानसिक आधार यावर मार्गदर्शन व चर्चासत्र झाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तज्ञ महिला व विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या त्यांच्याकडून ग्रुप डिस्कशन व चर्चा करण्यात आली व कृती समिती बनवण्याचा निर्णय झाला विभाग प्रमाणे महिला हक्क परिषद घेण्यासाठी संस्थांना जबाबदारी देण्यात आली(उपस्थित प्रमुख मान्यवर श्री. रविंद्र चव्हाण, मा. संचालक यशदा व बार्टी, पुणे मा. श्री. विशाल लोंढे सहा. आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे मा. श्री, पुणे मा. नंदिनी आवडे (भाप्रसे) सदस्य सचिव, राज्य महिला आयोग, मुंबई मा. श्री. राहुल मोरे, सह आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे ) विविध योजनांची माहिती सांगितली महिलांच्या अतिशय संवेदनशील प्रश्नावर पहिल्यांदाच “एकल महिला हक्क परिषद “घेण्यात आली नंदिनी आवडे यांनी आपले विविध क्षेत्रातील अनुभव कथन केले व धोरणात्मक चर्चा करण्यात आली

रोहिणी सानप – निंबोरेसमन्वयक, एकल महिला हक्क परिषद ऍड .चंद्रकांत भोसले,अध्यक्ष एकता ग्राम विकास संस्था व मा. विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम करण्यात आला नंदकिशोर लोंढे व ऍड.चंद्रकांत भोसले यांचे अतिशय बहुमोल असे सहकार्य लाभले
